भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कात्रज बायपास चौकात वाहतुक नियमन करत असताना पोलिसाला दुचाकीस्वाराने मारहाण केल्याची घटना १६ ऑगस्टला सकाळी ११:०० च्या सुमारास घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणाला अटक करण्यात आली आहे.
पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस अमंलदार दिपक सदाशिव भोईर यांनी तक्रार दाखल केली असून आशीष रामचंद्र चव्हाण (वय ३७ वर्ष रा. चंद्राई हाईटस, फ्लॅट नं.१, धनकवडी) यास शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यामुळे अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी दिपक भोईर शासकीय गणवेशात त्यांचे इतर पोलीस सहका-यांसह कात्रज बायपास चौकात वाहतुक नियमन करत होते. त्यावेळी आशीष रामचंद्र चव्हाण हा त्याच्या ताब्यातील दुचाकी ही जोराने व वेडीवाकडी चालवून वाहतुक नियमभंग करत आला.
त्याला दुचाकी बाजुला घेवून लायसन व कागदपत्रे मागत असताना त्याने फिर्यादी सोबत अरेरावी व ऊदट वर्तन केले. फिर्यादी यांना मारहान केली. गुडघ्यावर व कंबरेवर जोरजोराने लाथा मारून गंभिर दुखापत करून शिवीगाळ केली. फिर्यादी यांचा शासकीय गणवेषाचा खिसा फाडून जिवे ठार मारण्याची धमकी देवून शासकीय कामात अडथळा निर्माण केला असून. हा तपास पोलीस निरिक्षक समीर शेंडे करीत आहेत.