आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

फिनिक्स मॉल बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Spread the love

पुणे : विमान नगर परिसरातील फिनिक्स मार्केटसिटी मॉल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल आल्याने परिसरात घबराट उडाली. याप्रकरणी विमान नगर पोलिसांनी ई-मेल पाठवणाऱ्या अनोळखी व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी आदित्य राजेश शितोळे (३०, रा. सोपाननगर, वडगाव शेरी) यांनी फिर्याद दिली आहे. शितोळे हे फिनिक्स मॉलमध्ये व्यवस्थापक आहेत. हिडनस बोन नावाच्या व्यक्तीने हा मेल पाठवला.

बॉम्बशोधक नाशक पथकाने (बीडीडीएस) मॉलची तपासणी केली. ‘मी आयुष्याला कंटाळलो आहे. मॉलमधील कोणी वाचू शकणार नाहीत. पोगो आणि नोरो मला त्रास देत आहेत,’ असे ईमेलमध्ये म्हटले होते. हा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सायबा पोटे करत आहेत.