आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पीएमपीत एक लाखाची बांगडी चोरली

Spread the love

पुणे : पीएमपीतून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या हातातील १ लाख ३२ हजार रुपयांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी चोरल्याची घटना कसबा पेठेतील फडके हौद चौक परिसरात घडली.

याबाबत मीरा मधुकर दिवसे (वय ६०, रा. हडपसर) या ज्येष्ठ महिलेने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला हडपसर भागात राहायला आहेत.

त्या हडपसरहून पीएमपी बसने पुण्यात आल्या होत्या. फडके हौद चौकातील बसथांब्यावर त्या उतरत असतानाच चोरट्यांनी सोन्याची बांगडी कटरने कापली. बांगडी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अरविंद शिंदे करत आहेत.