आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सासरच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Spread the love

पुणे : पत्नी आणि सासरच्यांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार येरवडा येथे घडला.

रियाज शेख असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचे सासरे मुजीब बाबू शेख, शाहीन शेख, चाँद मौला शेख, पत्नी सुफी रियाज शेख, सना उस्मान शेख आणि मेहरून शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत तरुणाची आई शमी मोहम्मद मुल्ला (५४, रा. एसई कॉलनी, शिंदे हॉस्पिटल, वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार १९ एप्रिल ते १७ ऑगस्ट दरम्यान घडला. मुजीब बाबू शेख यांच्या मुलीशी मयत तरुण रियाज शेख यांच्याशी लग्न झाले होते. मात्र त्याच्यांत वाद होत होते. पुढील तपास लोणीकंद पोलिस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक वैजनाथ केदार करत आहेत.