आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

ड्रग्स प्रकरणातील आरोपीस गुजरात येथुन अटक

Spread the love

पुणे : विश्रांतवाडी ड्रग्स प्रकरणातील आरोपीस गुजरात येथुन अटक करण्यात गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाला यश आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक उल्हास कदम करित आहेत. गुन्हयातील अटक आरोपी निमिष अबनावे याच्याकडे चौकशी व तपास केला असता मोहम्मंद अस्लम मोहम्मंद ईस्माईल मर्चेंट हाआणखी एक आरोपी निषन्न झाला.

आरोपीची गोपनिय माहिती घेवुन पोलीस उप निरीक्षक दिगंबर कोकाटे यांनी पोलीस पथका सह गुजरात मध्ये कारवाई केली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने अंगली पदार्थ विरोधी पथक १ व टिम यांनी जंबुसर (जि. भरुच राज्य गुजरात) येथुन सापळा रचुन मोहम्मंद अस्लम मोहम्मंद ईस्माईल मर्चेंट याला शिताफिने ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सपोनि नितीन नाईक, पोलीस उप निरीक्षक दिंगबर कोकाटे, पोलीस उप निरीक्षक अविनाश लोहोटे, नितेश जाधव, दया तेलंगे पाटील, अविनाश कोंडे यांनी केली आहे.