आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पुजा साहित्य विक्रीच्या दुकानदारावर हल्ला

Spread the love

पुणे : बिबवेवाडी येथीलपुजा साहित्य विक्रीच्या दुकानावर विक्री करत असताना जुन्या किरकोळ वादातून दुकानदारावर एकाने जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी पुजा साहित्य विक्री करत असताना जुन्या किरकोळ वादाच्या कारणावरुन फिर्यादी यांच्याशी बोलत असताना फिर्यादी यांच्या एका हाताने तोंड दाबुन, मला मारायला येतो काय, आत्ता तुला खल्लासच करतो असे म्हणून त्याने गळ्यावर चाकुने वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले करीत आहेत.