सहकारनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या काही गुन्हेगारांना पोलिसांनी छापा टाकून पकडले होते. त्यावेळी दोघे फरार झाले होते. त्यांना सहकानगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. हे दोन्ही आरोपी ६ जून पासून फरार होते. त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
या प्रकरणी सहकारनगर पोलिसात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. ०६ जून रोजी सहकारनगर पोलिसांनी बिकानेर चौकाकडुन तळजाई मंदीराकडे जाणारे रोडवरील कै. सदु शिंदे स्टेडीअमच्या पुढे कारवाई केली होती रस्त्याच्या कडेला अंधारात काही इसम नागरीकांना लुटण्यासाठी दबा धरुन बसले होते.
त्यांचेकडे कोयते, लाकडी बांबु अशी हत्यारे आहेत. अशी खबर मिळाल्याने पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी अमर काथवटे, ऋषीकेश उर्फ ऋषी शिंदे, अभिजीत चंदनशिवे यांना अटक केली होती. तर गणेश अनंत काथवटे व अमित ऊर्फ ऋद्यनाथ बाबु वावरे, दोघे ही (रा. अण्णाभाऊ साठे नगर, अरणेश्वर पुणे) हे गुन्हा झाल्या पासुन २ महिने फरार होते.
दि. १६ ऑगस्ट रोजी सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अंमलदार अमोल पवार व किरण कांबळे यांना माहिती मिळाली की सदर गुन्हयांत फरार असलेला आरोपी गणेश कायवटे हा लेकटाऊन बिबवेवाडी पुणे जवळ मित्रला भेटण्यासाठी येणार आहे.
हि माहिती सहकारनगर पोलीस स्टेशन कडिल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांना कळविली असता त्यांनी लागलीच कारवाईचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे व अंमलदार यांची टीमने छापा टाकुन आरोपीस ताब्यात घेतले. गणेश अनंत काथवटे (वय २३ वर्षे रा. आण्णाभाऊ साठे नगर अरण्येश्वर पुणे) याने गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
तसेच दि. १७ ऑगस्ट रोजी रोजी सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अंमलदार महेश मंडलीक यांना माहिती मिळाली की गुन्हयांत पाहिजे असलेला आरोपी अमित ढावरे हा राहते घरी आला आहे.
तेथे ही छापा टाकुन अमित ऊर्फ ऋद्यनाथ बाबु ढावरे यास ताब्यात घेण्यात आले. गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यास अटक करण्यात आली आहे. सदरची कामगीरी सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) भजनावळे, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे, सहा. पोलिस उपनिरीक्षक बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, किरण कांबळे, चंद्रकांत जाधव, महेश मंडलिक, अमित पद्माळे, सागर कुंभार, सागर सुतकर, बजरंग पवार, विशाल वाघ, खंडु शिंदे यांनी केली.