आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पुणे शहरातील मंदीराची दानपेटी चोरी करणारे केले जेरबंद

Spread the love

पुणे : पुणे शहरातील भरवस्तीत असलेल्या मंदीरातील दानपेटी चोरी करण्याचे गुन्हे गेल्या महिन्याभरात वाढले होते. चोरट्यांनी मंदिरातील दानपेट्यासह रोकड रक्कम चोरली होती. त्यामुळे भाविक व नागरिकात प्रचंड संताप होता. मात्र गुन्हे शाखा, युनिट १ च्या पोलीस पथकाने या चारही गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळवले आहे. पोलिसांनी चोरट्यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.०८ ऑगस्ट रोजी प्रगतिशील मित्र मंडळ गणपती मंदीर, ८ नारायण पेठ येथील मंदीर बंद असताना चोरट्याने दरवाजा उघडुन मंदीरातील दानपेटी त्यातील कि. रू. ११,०००/- ची चोरी करून उचलुन नेली होती. विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

भरवस्तीमध्ये मंदीरामधील दानपेटी चोरी सारखा गुन्हा घडल्याने वरिष्ठांनी गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी घटना स्थळापासुन विविध भागातील सी.सी.टी.व्ही. फुटेज ची तपासणी केली. त्यांनी युनिट-१ कडील पोलीस अधिकारी आशिष कवठेकर, पोलीस अंमलदार निलेश साबळे, दता सोनावणे, महेश बामगुडे, महेंद्र तुपसुंदर असे तपास पथक तयार करुन त्यांना सुचना केल्या.

प्राप्त झालेल्या फुटेजची पहाणी करीत असताना पोलीस अंमलदार निलेश साबळे व दत्ता सोनावणे यांनी गुन्हा करते वेळीचे आरोपीचे सी.सी.टि.व्हि. फुटेज मधील दुचाकी गाडीचा नंबर मिळवला. त्यावरुन सदर मालकाचा नाव पत्ता वरुन मालकाचा शोध घेतला. सदर मालकाकडे सखोल चौकशी करता त्याने सदर गाडी त्याची असल्याचे सांगितले सदर मोटर सायकलचे प्राप्त सीसीटीव्ही फुटेज त्यास दाखविले असता त्याने ट्रीपल सीट असलेल्या मुलांपैकी दोन मुलांना ओळखळे.

त्यांच्याकडुन प्राप्त माहितीच्या आधारे इंदीरा वसाहत झोपडपट्टी गणेशखिंड रोड औंध येथे पोलिसांनी स्टाफसह सापळा रचला. तेथे विधीसंर्घषित बालक मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यांच्याकडे गुन्हयांची अधिक चौकशी केली. त्याने साथीदार साहिल माने व विर्धासंर्घषित बालक यांच्यासह दानपेटी चोरी केली असल्याचे सांगितले. त्याचेकडे केलेला तपासामध्ये संत तुकाराम मंदीर, तुकाराम पादुका चौक डेक्कन, शनिपार चौक येथील देवी मंदीर, प्रगतिशील मित्र मंडळ गणपती मंदीर येथील दानपेटी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे साहिल माने हा त्याच्या राहत्या घरी आला असल्याची खबर मिळाली. पोलिसांनी स्टाफच्या मदतीने त्यास ताब्यात घेतले आहे. साहिल अशोक माने (वय १९ वर्ष रा. इंदीरा वसाहत औंध पुणे) यास अटक करण्यात आली आहे. चार गुन्हे उघडकीस आले असुन त्यांच्याकडे इतरही तपास चालू असुन त्यांना पुढील कारवाई कामी डेक्कन पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी युनिट ०१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे, निलेश साबळे, महेश बामगुडे, महेंद्र तुपसुंदर, आण्णा माने, शशीकांत दरेकर, अभिनव लडकत, विठ्ठल सांळुखे, रुक्साना नदाफ यांनी केली आहे.