आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

चोरीच्या दोन घटनात १८ लाखाचा ऐवज लंपास

Spread the love

पुणे : टिंबर मार्केट व सदाशिव पेठेत चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्याचांदीचे दागिने व रोकड असा १८ लाख रुपयांचा माल लंपास केला आहे.

खडक पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १८ ऑगस्ट रोजी ही घटना सकाळी ७ ते ११ च्या सुमारास घडली आहे. २८९२ न्यु कल्पतरु – सोसायटी बिल्डींग नं.०४ प्लॅट नं.४२ न्यु टिंबर मार्केट व १८८४ रघुसिता अपार्टमेंट नातु बाग सदाशिव पेठ या दोन ठिकाणी ही चोरी झाली आहे.

फिर्यादी यांच्या फ्लॅटचे उघड्या दरवाज्या वाटे, कोणीतरी अज्ञात इसमाने घरामध्ये प्रवेश केला असून रोख रक्कम २५,०००/- रुपये व सोन्याचे दागिने असा १७,६०,०००/- रुपये किंमतीचा ऐवज घेऊन पसार झाला.

तसेच नातु बाग सदाशिव पेठ पुणे येथील घरातुन रोख रक्कम १६००/- रुपये व २६, ३५०/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा दोघांचा एकुण १८,१२,९५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. हा तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. सुरवसे करीत आहेत.