आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बोपोडी नजीक अपघातात दुचाकीस्वारचा मृत्यू

Spread the love

पुणे : जुना पुणे मुंबई हायवेवर बोपोडी रेल्वे स्टेशन जवळील गोपीचाळ येथे वाहनाने धडक दिल्याने अपघातात एक दुचाकी स्वार ठार झाला.

खडकी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात रमेश बुग्या लावुडया (वय ४३ वर्षे रा. शास्त्रीनगर चौक ज्ञानराज शाळे शेजारी पिंपरी चिंचवड) हा मयत झाला असून त्याच्या भावाने पोलिसात तक्रार दिली आहे. १८ ऑगस्ट रोजी दुपारी १:३० च्या सुमारास हा अपघात झाला. वाहन चालक अपघाताची खबर न देता पळून गेला आहे. हा तपास सहायक पोलीस निरीक्षक किरण देशमुख करीत आहेत.