आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

वाघोलीत टोळक्याने दुचाकी दिली पेटवून

Spread the love

पुणे : जुन्या वादातून वाघोलीत एका तरुणाची दुचाकी चारजनाच्या टोळक्याने पेटवून दिल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री ही घटना घडली. चारजनाच्या टोळक्याने फिर्यादीला घराबाहेर बोलावून शिवीगाळ केली.

व घरासमोर लावलेल्या दुचाकीवर पेट्रोल टाकून पेटवून दिली. गाडीचे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्या टोळक्याने परिसरात दहशत करून तेथुन निघून गेले. हा तपास पोलीस उप-निरीक्षक वैजिनाथ केदार करीत आहेत.