आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कारच्या डिक्कीतून तीन लाख रुपयांची चोरी

Spread the love

पुणे : पुण्यातील एका कार्यालया बाहेर पार्क केलेल्या कार मधील तीन लाखाची रक्कम चोरीस गेली आहे.

या प्रकरणी कुमार विजय शिंदे (वय ४१ वर्ष रा. मल्हार मार्तंड सोसायटी सहकारनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुमार विजय शिंदे यांनी आर्किटेक्स ऑफिस समोर सुभाषनगर शुक्रवार पेठ येथे कार पार्क करुन लॉक केली होती. व ते कार्यालयात गेले होते. तेव्हा चोरट्याने डिक्की उघडून त्यात ठेवलेली बँग चोरून नेली. त्यात तीन लाखाची रोकड होती. हा तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे करीत आहेत.