आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

टास्कमध्ये नफ्याचे आमीष दाखवून फसवणुक

Spread the love

पुणे : टास्कमध्ये पैसे गुंतवणुक करून मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवून पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला ५५ वर्षाची आहे. त्यांना एका तरुणाने मोबाईलवर संपर्क साधला व टास्क पूर्ण केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवले. टास्कमध्ये पैसे गुंतवणुक करण्यास सांगुन व सांगितलेल्या हॉटेलला रिव्हीव देण्याचा टास्क देवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले.

फिर्यादी यांच्या बँक खाते व फिर्यादी च्या मुलीच्या बँक खाते मधून रक्कम ५,२४,१००/- रूपये भरण्यास सांगितले व नफा न देता त्यांची फसवणूक केली. हा तपास पोलीस निरीक्षक मनोज शेडगे करीत आहेत.