वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मनीलाँड्रींगची केस आहे असे सांगुन चौकशी करण्याच्या बहाण्याने पैसे पाठवण्यास भाग पाडुन ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना वारजे माळवाडी परिसरात घडली आहे. वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनोळखी तरुणाने फिर्यादी यांच्याशी मोबाईलवर संवाद केला. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांचे विरोधात मनीलाँड्रींगची केस आहे असे सांगुन चौकशी करण्याच्या बहाण्याने पैसे पाठवण्यास भाग पाडुन ३०,००,०००/- रुपये किमतीचे आर्थिक फसवणुक केली. दि. २ ते ७ ऑगस्ट दरम्यान हा प्रकार घडला आहे. हा तपास पोलीस निरीक्षक निलेश बडाख करीत आहेत.