आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गळयातील सोन्याची चेन चोरणारे ४ आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Spread the love

पुणे : गेल्या काही महिन्यात पायी जाणाऱ्याच्या गळ्यातील सोन्याच्या चैन हिसकावण्याच्या घटना वाढल्या होत्या. मात्र विश्रामबाग पोलिसांनी सोन्याची चैन हिसकावनाऱ्या चार जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणले असून सुमारे ५० ग्रम वजनाच्या चैन जप्त केल्या आहेत.

लक्ष्मी रोडवरून जात असताना १२ ऑगस्ट रोजी फिर्यादी हे त्याच्या दुचाकीवरुन रात्री जात असताना दोन दुचाकीवर आलेल्या चार अनोळखी तरुणांनी मारहाण करुन गळयातील सोन्याची चेन हिसकावुन नेली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी तपास पथकाचे अधिकारी मनोज बरुरे व अंमलदार यांना गुन्हा उघडकीस आणणे बाबतसूचना केल्या होत्या.

दाखल गुन्हयाचे तपासात विश्रामबाग तपास पथकातील अंमलदार राहुल मोरे यांनी तांत्रीक विश्लेषनाचे आधारे व गोपणीय खबरी यांचे मदतीने सदरचा गुन्हा १) कासीम आसीफ अन्सारी (वय २२ वर्षे, रा. मोमीनपुरा, गंजपेठ, पुणे) २) अनिकेत अनिल फासगे (वय २२ वर्षे, रा. वस्ताद साळवे स्मारकाचे पाठीमागे, गंज पेठ, पुणे) ३) आश्रफ गवुस सय्यद (वय २० वर्षे, रा. नवीन म्हाडा, विल्डींग न २१, तिसरा मजला, फ्लॅट नं ३१०, वैदुवाडी, हडपसर, पुणे) व ४) विधीसंघर्षीत बालक (वय १७ वर्षे ११ महिने, रा. इंदिरा नगर अप्पर, पुणे) यांनी केल्याचे निष्पन्न केले.

गुन्हयातील आरोपीना पोलीस उपनिरीक्षक बरुरे व पोलीस अंमलदार गणेश काठे, राहुल मोरे, आशिष खरात, संतोष शेरखाने, सात्ताप्पा पाटील, अर्जुन थोरात यांनी पकडुन त्याच्याकडे अधिक तपास केला.

त्यांनी वारजे पोलीस स्टेशन हददीत एका दुचाकीस्वारास अडवुन त्यांच्या गळयातील सोन्याची साखळी हिसकावून घेतल्याचे कबुल केले असुन सदर बाबत वारजे माळवाडी पोलीस ठाणेस अन्वये गुन्हा नोंद आहे.

तसेच आरोपीकडुन गुन्हयात वापरलेल्या दोन दुचाकी व दोन्ही गुन्हयातील ३० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व १८ ग्रॅम वजनाची सोन्याची सोन्याची चेन जप्त करण्यात आलेल्या आहेत. गुन्हयाचा तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज बरुरे करीत आहेत.

सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे), अरुण घोडके, तसेच पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे, पोलीस अंमलदार मयुर भोसले, गणेश काठे, आशिष खरात, अर्जुन थोरात, राहुल मोरे, साताप्पा पाटील, संतोष शेरखाने व सागर मोरे यांनी केलेली आहे.