सोलापूर ग्रामीण पोलीस व मंगळवेढा पोलिसांनी टाकला छापा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
मंगळवेढा : सोलापूरला नवीन पोलीस अधीक्षक आल्यानंतर पोलीसदल सक्रीय झाले आहे. गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या सोलापुर ग्रामीण पोलीस पथकाने व मंगळवेढा पोलिसांनी संयुक्तरित्या जुगार आड्यावर छापा टाकुन जुगार खेळणाऱ्या ९ आरोपीना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाली होती, यांनी पोलीस निरीक्षक मंगळवेढा यांना कळविले की, मौजे शेलेवाडी शिवारात चव्हाण वस्ती येथे शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम चोरुन पत्यावर पैशाची पैज लावुन तिरट नावाचा जुगार खेळत आहेत.
त्याचेवर तात्काळ कायदेशीर कारवाई करा. मंगळवेढा पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे, पोलीस हवलदार महेश माने, सचिन काळेल, सर्जेराव वाघमोडे असे मंगळवेढा पोलीस स्टेशन कडील पथक तयार केले व पोलीस अधिक्षक, सोलापुर ग्रामीण यांचे पथकातील पोलीस निरीक्षक डी एस बोरीगीडे, कृष्णा हानवता धनवे, रवीदास दहऱ्या गावीत, चंद्रकांत चिंतामन चौधरी व संदेश भारत गाडे असे अधिकारी व अंमलदार यांनी पंचासह शेलेवाडी येथील चव्हाण वस्ती येथे गेले व छापा टाकला.
तेथे दोन्ही पथकाला एक पत्र्याचा शेड दिसला त्या पत्राशेडला लागुन 0८ मोटारसाईकली लावलेल्या दिसल्या. पत्राशेडमध्ये 0९ लोक गोलाकार बसलेले दिसले. त्यांच्या मधोमध पत्याची पाने व रोख रक्कम तसेच हातामध्ये काही पत्याची पाने घेवून ते तिरट नावाचा जुगार खेळत असल्याचे दिसुन आले.
पोलिसांनी १) दत्तात्रय अंकुश लवटे (वय 41 वर्षे) २) गोपाळ सुभाष मासाळ (वय 32 वर्षे दोघे रा तनाळी ता पंढरपुर) ३) सतिश विजय कोपे (वय 49 वर्षे रा तावशी ता पंढरपुर) ४) संतोष कुबेर इंगळे (वय 30 वर्षे) ५) गणेश मारुती चव्हाण (वय 28 वर्षे रा शेलेवाडी ता मंगळवेढा) ६) विजय जगन्नाथ यादव (वय 36 वर्षे) ७) गजानान गोरख माने (वय 36 वर्ष दोघे रा मारापुर ता मंगळवेढा) ८) नंदकुमार उत्तम सरगर (वय 30 वर्षे) ९) बालाजी बंडू सरगर (वय 28 वर्ष दोघे रा अकोला रोड सरगर वस्ती मंगळवेढा ता मंगळवेढा) यांना ताब्यात घेतले आहे.
पत्राशेड मनोज भागवत चव्हाण (रा शेलेवाडी ता मंगळवेढा )याचा असल्यची माहिती मिळाली आसून तो जुगार क्लब चालवीतो असे आरोपींनी सांगीतले. पोलिसांनी रोख रक्कम, मोबाइल,दुचाकी व इतर साहित्य असा एकूण ४,०३,४५८/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे यांनी पंचासमक्ष ही कारवाई केली. पोलीस हवालदार सर्जेराव वाघमोडे यांनी फिर्याद दाखल केलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास तुकाराम कोळी करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी सोलापुर ग्रामीण, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा उप विभाग मंगळवेढा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक डी एस बोरीगीडे, मंगळवेढा पोलीस स्टेशनकडील पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सपोनि अंकुश वाघमोडे, सचिन काळेल, महेश माने, कृष्णा हानवता धनवे, रवीदास दहऱ्या गावीत, चंद्रकांत चिंतामन चौधरी व संदेश भारत गाडे यांनी केली आहे.