आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

डॉ. डी. वाय. पाटील औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये रॅगिंग विरोधी जागरूकता सप्ताह साजरा

Spread the love

पुणे: आकुर्डी स्थित डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये १२ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२४ या दरम्यान रॅगिंग विरोधी जागरूकता सप्ताह साजरा करण्यात आला. हा जागरूकता सप्ताह महाविद्यालयातील वातावरण सुरक्षित व रॅगिंग मुक्त करण्यासाठी साजरा करण्यात आला आहे असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी व्यक्त केले.

या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रॅगिंगच्या प्रभावावर प्रकाश टाकणारा रोल प्ले आणि स्किट परफॉर्मन्स विद्यार्थ्यांनी सादर केला. तसेच स्लोगन स्पर्धा, निबंध स्पर्धा व पोस्टर स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती.

त्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या सप्ताहामध्ये दामिनी पथक क्रमांक 1 आणि क्रमांक 2 यांनी महाविद्यालयाला भेट दिली. तसेच पीएसआय पुरुषोत्तम चाटे, पोलिस कॉन्स्टेबल आंधळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कॅम्पसमध्ये रॅगिंग मुक्त वातावरण राहावे अशी सर्वांनी प्रतिज्ञा घेतली. या सप्ताहामधील सर्व कार्यक्रमांच्या यशस्वी नियोजनासाठी डॉ. सोनाली महापरळे आणि प्रा. तेजश्री देवकुळे व सर्व प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले.