आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पादचारी युवकाला मारहाण, लुटण्याचा प्रयत्न

Spread the love

पुणे : वानवडीतील डोमिनोज पिझ्झा दुकानाच्याजाळून पहाटेच्या सुमारास पायी जाणाऱ्या एका तरुणाला दुचाकीवर आलेल्या दोघांनी मारहान केली. या प्रकरणी वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे पहाटेच्या वेळी पायी चालत जात असताना दुचाकी वरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीस तुझ्याकडे काय आहे ते दे असे म्हणत धमकी दिली. फिर्यादी यांनी त्यास विरोध केल्याने दोघांनी त्याच्या कडील लोखंडी हत्याराने फिर्यादीला डोक्यात मारुन जखमी केले. हा तपास पोलीस उपनिरीक्षक धीरज कांबळे करीत आहेत.