आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गुंतवणुकीच्या आमिषाने १३ लाखाची फसवणूक

Spread the love

पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने लोहगावातील नागरिकाची १३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २६ ते २८ मे दरम्यान हा प्रकार घडला आहे. अनोळखी तरुणाने फिर्यादीशी मोबाईलवर संपर्क साधून विश्वास संपादन केला.

फिर्यादीस शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडुन त्यांचे बँक खाते व युपीआयडी वर १३,१३,९००/- रुपये ट्रान्सफर करण्यास सांगुन कोणताही परतावा न देता आर्थिक फसवणुक केली आहे. हा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) सर्जेराव कुंभार करीत आहेत.