आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गुंतवणुकीच्या आमिषाने ११ लाखाचा गंडा

Spread the love

पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने कोंढवा परिसरातील नागरिकाची ११ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १२ जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान हा प्रकार घडला आहे. अनोळखी तरुणाने  फिर्यादीशी मोबाईलवर संपर्क साधून विश्वास संपादन केला. मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवले पण कोणताही परतावा न देता ११,४६,३१५/- रुपये किमतीची आर्थिक फसवणुक केली आहे. हा तपास पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील करीत आहेत.