आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भेकराईनगरमध्ये चारचाकी वाहनाची तोडफोड

Spread the love

पुणे : जुन्या वादातून घरासमोर लावलेल्या चारचाकी वाहनाची मोडतोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न एका टोळक्याने भेकराई नगरमध्ये २४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री केला.

फिर्यादी यांचे पार्क केलेल्या चारचाकी गाडीचे नुकसान करून हातातील हत्यारे हवेत फिरवत “आम्ही इथले भाई आहोत, मरायचे असेल तर पुढे या,” अशी धमकी देऊन परीसरात दहशत निर्माण केली.

पोलिसांनी अक्षय पोपटराव पाडुळे (वय ३० वर्षे, रा. म्हाडा वसाहत, विमाननगर) आणि चंद्रकांत पिंटू काबळे (वय २१ वर्षे, रा. गोसावी वस्ती, वैदवाडी, हडपसर) यांना अटक केली आहे. त्यांचे इतर नऊ साथीदारांचा शोध पोलिस घेत आहेत. हा तपास पोलिस उपनिरीक्षक बापूसाहेब खंदारे करत आहेत.