येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : खराडीतील एका तरुणास हत्याराचा धाक दाखवून लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैद्राबादी हॉटेल, लक्ष्मीनगर, येरवडा येथून फिर्यादी तरुणास दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी नेले.
त्याला मारहाण करून धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि अंगठी, एकूण २५ हजार रुपये किमतीची, चोरून नेली.
भरदिवसा ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा तपास येरवडा पोलिस करीत आहेत.