आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

खडकीत जुन्या वादातून डोक्यात केले वार

Spread the love

पुणे : जुन्या वादातून खडकीतील एका तरुणास बेदम मारहाण करून डोक्यात लोखंडी हत्याराने वार करण्यात आले. या प्रकरणी खडकी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रेल्वे ब्रिजजवळ ही घटना घडली.

फिर्यादीची गाडी अडवून त्याला बाहेर काढून मारहाण केली. त्याच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करण्यात आले.

पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. प्रतीक सपकाळ याला अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक गजानन चोरमले या प्रकरणाचा तपास करीत आहेत.