आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गिफ्ट देण्याच्या आमिषाने ३८ लाख रुपयांची फसवणूक

Spread the love

पुणे : “परदेशातून आलो आहे आणि मित्राला गिफ्ट द्यायचे आहे,” असे सांगून एका तरुणाची ३८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाला मोबाइलवर संपर्क साधून सांगण्यात आले की, “भारतात स्थायिक व्हायचे आहे आणि त्यासाठी मित्र शोधत आहे.” गिफ्ट पाठवतो असे आमिष दाखवले गेले.

त्यासाठी कस्टम शुल्क भरावे लागेल असे सांगून फिर्यादीकडून ३८,४२,१९९ रुपये भरण्यास सांगण्यात आले. पण गिफ्ट मिळाली नाही. हडपसर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार तरुणाची फसवणूक झाल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे करीत आहेत.