आवृत्ती पुणे
← Back to Homepage

नफ्याच्या आमिषाने ३६ लाखांची फसवणूक

Spread the love

पुणे : शेअर बाजारातून गुंतवणुकीद्वारे मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवून मॉडेल कॉलनीतील ७० वर्षीय आजोबांची ३६ लाखांची फसवणूक झाली आहे. चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २१ ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी तरुणाने फिर्यादीशी मोबाईलवर संपर्क साधला. शेअर्सची माहिती देऊन गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवून, फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.

वेगवेगळ्या शेअर्समध्ये पैसे गुंतवून फायदा मिळण्याचे आमिष व प्रलोभन दाखवून, परतावा मिळत असल्याचे दाखवत फिर्यादींना अजून पैसे गुंतवण्यासाठी भरीस पाडून, फिर्यादींची एकूण ३६,९०,०००/- रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक नांद्रे करीत आहेत.