आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वाहनाच्या धडकेने एक ठार

Spread the love

पुणे : कदमवाकवस्ती गावाच्या हद्दीत प्राजक्ता हाडके पेट्रोलपंपासमोर, पुणे-सोलापूर रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने एक जण ठार झाला.

अपघातात एक अनोळखी इसम (वय अंदाजे ६५ वर्षे) रस्ता ओलांडताना धडक बसल्याने ठार झाला. अपघातानंतर वाहन चालक न थांबता, कोणतीही खबर न देता पळून गेला. हा तपास सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.