आवृत्ती पुणे
← Back to Homepage

जप्त केलेली ३१ वाहने ज्याची आहेत त्यांनी घेऊन जा

Spread the love

पुणे: बिबवेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे बिनधनी दुचाकींची एकूण ३१ वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्यांची माहिती पुणे पोलीस वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. नागरिकांनी वेबसाईटवर आणि बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे खात्री करून, त्यांची वाहने असल्यास ती ताब्यात घेऊन जावीत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे बिनधनी दुचाकींची एकूण ३१ वाहने पंचनाम्याने जप्त करण्यात आली आहेत. सदर वाहनांपैकी काहींच्या मूळ मालकांचा वेळोवेळी शोध घेऊनही, मूळ मालक मिळून आलेले नाहीत, अथवा आजपर्यंत कोणीही हक्क सांगण्यासाठी समोर आलेले नाही.

त्यामुळे बिबवेवाडी पोलीस स्टेशनकडून सदर ३१ जप्त वाहनांचे नंबर, चेसिस आणि इंजिन नंबर यांची माहिती पुणे शहर पोलीस संकेतस्थळावर दि. २० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

नागरिकांनी “प्रसिद्धी दिनांकापासून पुढील १ महिन्याच्या आत वाहनांचे कागदपत्रांसह” बिबवेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे भेट देऊन वाहनांबाबत खात्री करावी, व वाहन ताब्यात घेण्याची पुढील कायदेशीर कार्यवाही करावी.

“तसेच ज्यावाहनांचे मूळ मालक मिळून येणार नाहीत, त्यावाहनांची कायदेशीर बाबींची पूर्तता करून लिलाव कार्यवाही करण्यात येणार आहे,” अशी माहिती बिबवेवाडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे दिली आहे.