आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अल्पवयीन चोरट्याकडून सात वाहनचोरीचे गुन्हे उघड

Spread the love

पुणे : दुचाकी चोरणाऱ्या विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून एकूण ०७ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणून एकूण ०३ दुचाकी गाड्या, ०३ ऑटो रिक्षा व ०१ चारचाकी गाडी जप्त करण्यात पुणे शहर पोलिसांच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाला यश आले आहे. त्याच्याकडून २,५०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडील अधिकारी व अंमलदार असे वारजे माळवाडी पोलीस स्टेशन कडील गुन्ह्यातील आरोपी व चोरीस गेलेल्या दुचाकी गाडीचा शोध घेत होते. पोलीस अंमलदार साईकुमार कारके व पोलीस हवालदार धनंजय ताजणे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, शनिवार पेठ, पुणे येथे चोरलेल्या ऑटो रिक्षासह एक व्यक्ती थांबला आहे.

ऑटो रिक्षा ही चोरीची असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. ऑटो रिक्षाच्या आर. टी. ओ. नंबरवरून माहिती काढली असता ती चोरीची असल्याचे समजले.

नमुद विधीसंघर्षग्रस्त बालकाकडे त्याचे पालकांसमक्ष आणून आणखी चौकशी केली असता त्याने ०३ दुचाकी गाड्या, ०३ ऑटो रिक्षा व ०१ चारचाकी गाडी असे चोरी केले असल्याचे सांगितले.

विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून एकूण ०७ वाहने जप्त करून वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले. त्याच्याकडून २,५०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस हवालदार बाळू गायकवाड, प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, गणेश ढगे, पोलीस नाईक रविंद्र लोखंडे, पोलीस अंमलदार साईकुमार कारके, महेश पाटील, श्रीकांत दगडे, शिवाजी सातपुते, नारायण बनकर यांनी केली आहे.