विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी दिली भेट
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) डॉ. जालिंदर सुपेकर यांनी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहास भेट दिली. त्यांनी कारागृह परिसरामध्ये वृक्षारोपण करून कारागृह सुरक्षेचा आढावा घेतला.
मुख्यालयामार्फत या कारागृहास देण्यात आलेले टी. व्ही. संच, ऍलन फोन, ई प्रिझन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मुलाखतासाठी संगणक संच, वॉशिंग मशीन, वॉकी-टॉकी, किव्हॉस मशीन, झेरॉक्स मशीन इत्यादी वस्तू कार्यान्वित केलेल्या आहेत किंवा नाही याची पहाणी केली.
तसेच ऍलन फोन, ई प्रिझन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मुलाखत या सुविधेचा लाभ कारागृहातील बंदी कशा प्रकारे घेत आहेत यांची प्रत्यक्ष पाहणी करून बंदयांच्या अडीअडचणी विचारून त्यांचे मार्गदर्शन केले.
भेटी दरम्यान विवेक झेंडे, अधीक्षक कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह, पांडूरंग भुसारे, उपअधीक्षक, स्मिता महाडीक, वैद्यकीय अधिकारी, चंद्रशेखर देवकर, वरिष्ठ तुरुंगाधिकारी, शैला वाघ, तुरुंगाधिकारी श्रेणी-१ व अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
