आवृत्ती पुणे
← Back to Homepage

आत्महत्या केलेल्या पोलीस महिलेचा मृतदेह सापडला

Spread the love

पुणे : इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केलेल्या पोलीस महिलेचा मृतदेह अखेर चौथ्या दिवशी सापडला आहे.

अनुष्का सुहास केदार (वय २०, रा. लक्ष्मीनारायणनगर, दिघी), असे या पोलीस महिलेचे नाव आहे. रविवारी (दि. २५) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास केदार यांनी इंद्रायणी नदीच्या नवीन पुलाजवळील गरूड खांबावरून नदीत उडी मारली होती.

त्यानंतर आळंदी पोलीस, आळंदी अग्निशमन विभाग, आणि एनडीआरएफ यांच्या पथकाकडून इंद्रायणी नदीत शोधकार्य सुरू होते. अखेर बुधवारी (दि. २८) संबंधित पोलीस महिलेचा मृतदेह गोलेगाव येथील नदीपात्रात आढळून आला आहे. दरम्यान, अनुष्का केदार यांनी नदीत उडी मारण्यापूर्वी तिच्या एका मित्राला फोन केला असल्याची माहिती मिळत आहे.