आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

प्राचार्या के.डी. धावणे यांना दलित मित्र गौरव पुरस्कार २०२४ प्रदान

Spread the love

बार्शी : दलित महासंघाच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय दलित मित्र गौरव पुरस्कार महाराष्ट्र विद्यालय बार्शीच्या प्राचार्या के.डी. धावणे यांना दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह, बार्शी येथे सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी केले, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार राजेंद्र राऊत हे होते. यावेळी जयवंत बोधले महाराज, तहसीलदार एफ. आर. शेख, अप्पर तहसीलदार वृषाली केसकर, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, नगर पालिका बार्शीचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, वकील संघाचे अध्यक्ष काकासाहेब गुंड, डॉ. अजित आव्हाड, नवनाथ चांदणे, श्रीधर कांबळे, प्रकाश मोहिते, अतुल नलगे उपस्थित होते.

या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री. बी. वाय. यादव, संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री. नंदन जगदाळे, संस्थेचे जनरल सेक्रेटरी तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी. टी. पाटील, संस्थेचे सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य अरुण देबडवार, संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे, शाळा समितीचे सदस्य व्ही. एस. पाटील, बी.के. भालके, सर्व संस्था कार्यकारिणी सदस्य, सर्व संस्था सदस्य, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका के.डी. धावणे, उपमुख्याध्यापक आर.बी. सपताळे, पर्यवेक्षक एस.सी. महामुनी, पर्यवेक्षिका एन.बी. साठे, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.