आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पिस्टल व काडतूस बाळगणाऱ्या तरुणास केले जेरबंद

Spread the love

पुणे : पिस्टल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणास चतुःश्रृंगी पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहे.

चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांना माहिती मिळाली की, आंबेडकर वसाहत, औंध, पुणे येथे एका व्यक्तीकडे पिस्टल असून तो पिस्टल कमरेला लावून फिरत आहे.

त्यांनी ही माहिती चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांना दिली. त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश दिल्यामुळे नरेंद्र पाटील व त्यांच्या पथकाने तेथे जाऊन सापळा रचला.

पोलिसांनी कुणाल संतोष लांडगे (वय २१ वर्षे, रा. आंबेडकर वसाहत, औंध, पुणे) याला ताब्यात घेतले. त्याच्या कब्जातून ३१,०००/- रुपये किमतीचे एक पिस्टल व दोन जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहेत.

त्याच्याविरुद्ध चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून, सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील करत आहेत.

सदर कामगिरी सहायक पोलीस आयुक्त, खडकी विभाग अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली, चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) युवराज नांद्रे, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रणिल चौगले, पोलीस अंमलदार दुशिंग, भांगले, खरात, तरंगे, दुर्गे, वाघवले, तांदळे, मोमीन, विशाल शिर्के, श्रीधर शिर्के, दांगडे, माने यांनी केली आहे.