आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

महिलेचा गळा दाबून जीव घेण्याचा प्रयत्न

Spread the love

पुणे : रात्रीच्या वेळी घरात शिरून अनोळखी तरुणाने महिलेचा गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. गणेश पेठेत २ सप्टेंबर रोजी रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली.

या प्रकरणी महिलेने फिर्याद दाखल केली असून फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घरी असताना एका इसमाने त्यांच्या घरात प्रवेश करून त्यांना मारहाण केली.

गळा दाबून, पाठीवर तसेच डाव्या पायाच्या मांडीवर चावून त्यांना जखमी केले आणि तोंडावर उशी दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे तपास करीत आहेत.