आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दुचाकीस्वारांनी तरुणाचा मोबाईल हिसकावला

Spread the love

पुणे : दुचाकीस्वारांनी एका पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावल्याची घटना एनआयबीएम रोड, कोंढवा येथे घडली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोराबजी मॉलसमोर एनआयबीएम रोड, कोंढवा येथे पायी जात असताना फिर्यादीच्या हातातील मोबाईल दोन दुचाकीस्वारांनी मागून येऊन हिसकावला. चोरांनी ४०,०००/- रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला आहे. कोंढवा पोलीस उपनिरीक्षक हसीना शेख तपास करत आहेत.