आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

येरवड्यात घर फोडून दागिन्यांची चोरी

Spread the love

पुणे : येरवड्यातील माजी सैनिक नगर परिसरातील बंद घर फोडून २,७४,५००/- रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी ही घटना घडली आहे. माजी सैनिक नगर येथील फिर्यादी यांचा राहता फ्लॅट कुलुप लावून बंद असताना कोणीतरी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलुप उचकटून आत प्रवेश केला.

घरातील हॉलमधील लोखंडी कपाटातील ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले २,७४,५००/- रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीस घेतली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सोळुंके करीत आहेत.