महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : एन टीव्ही न्यूज मराठीचे पत्रकार व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष गौस भाई शेख यांना एन टीव्ही न्यूज मराठीचा दिला जाणारा महात्मा फुले समाज रत्न पुरस्कार अहमदनगर महाराष्ट्र राज्य डिजीटल मिडियाचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
एन टी व्ही मराठी चे संपादक एकबाल शेख यांचा एन टी व्ही च्या वर्धापन दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी भूम तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय शेटे , दैनिक भास्कर चे पत्रकार अरविंद शिंदे ,आदि मान्यवर उपस्थित होते.

















