आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

हांडेवाडीयेथील चार वाहने आगीत खाक

Spread the love

पुणे : हांडेवाडी येथील नॅशनल स्क्रॅप सेंटर दुकानासमोर पार्क केलेल्या दोन गाड्यांना कोणीतरी पेटवून दिल्याने सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किस्टोन कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शेवाळवाडी फाटा, हांडेवाडी येथे ही घटना घडली आहे. स्क्रॅप सेंटर दुकानासमोर पार्क केलेल्या दोन गाड्यांना अज्ञात इसमाने कसल्यातरी ज्वलनशील पदार्थाच्या सहाय्याने आग लावली.

या आगीमध्ये त्याशेजारी लावलेल्या आणखी दोन गाड्यांचेही नुकसान झाले, असे एकूण चार चारचाकी गाड्यांचे २,७५,०००/- रुपये किमतीचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विष्णु देशमुख करीत आहेत.