आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

शेअर गुंतवणुकीतून महिलेची सहा लाखांची फसवणूक

Spread the love

पुणे: इन्व्हेस्ट केलेल्या रकमेवर अधिक परतावा मिळेल, असा विश्वास दाखवून शेअर गुंतवणुकीस भाग पाडून एका महिलेची साडेसहा लाखांची फसवणूक करण्याची घटना उघडकीस आली आहे. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जून ते १९ जुलै दरम्यान हा प्रकार घडला आहे. अनोळखी तरुणाने ऑनलाईन माध्यमातून फिर्यादींना व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करून घेतले. इन्व्हेस्ट केलेल्या रकमेवर अधिक परतावा मिळेल, असा विश्वास दाखवून विश्वास संपादन केला आणि पैसे ट्रान्सफर करण्यास सांगून फिर्यादीची ६,५०,९९५ रुपये आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक निलेश बडाख करीत आहेत.