आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने १३ लाखांची फसवणूक

Spread the love

पुणे : शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने कात्रज येथील एका तरुणाची १२ लाखांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अनोळखी व्यक्तीने ऑनलाइन माध्यमातून फिर्यादींशी संपर्क साधला आणि शेअर ट्रेडिंगबाबत माहिती देऊन त्यात नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

अॅप डाउनलोड करून त्यात भरघोस नफा मिळत असल्याचे दाखवून बँक खात्यावर पैसे ट्रान्सफर करून घेत फिर्यादीची १२,९७,०००/- रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने करत आहेत.