आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दोन चंदनाच्या झाडाची कापुन चोरी

Spread the love

पुणे : मुकुंदनगर येथील चंदनाच्या झाडांची कापून चोरी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २ तारखेला मध्यरात्री घडली. चार चोरट्यांनी सीजीएस हॉस्पिटलजवळील साधना अपार्टमेंट, मुकुंदनगर आणि श्री केतन अपार्टमेंट, फ्लॅट नं. २, टीएमव्ही कॉलनी, मुकुंदनगर येथील कंपाऊंडमधून प्रवेश करून १०,०००/- रुपये किमतीच्या आणि दुसऱ्या बंगल्यातून ५,०००/- रुपये किमतीच्या असे एकूण १५,०००/- रुपये किमतीच्या चंदनाच्या झाडांची चोरी केली आहे. हा तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र कस्पटे करीत आहेत.