दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : हवेली पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण कडील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी व विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ०२ तासाच्या आत दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने जेरबंद केले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे व अंमलदार प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, गणेश ढगे, साईकुमार कारके हे आरोपीचा शोध घेत होते.पोलीस अंमलदार साईकुमार कारके यांना सी.सी.टि.व्ही. फुटेजच्या आधारे व त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,मुद गुन्ह्यातील जखमी इसमावर वार केले ते दोन इसम हे खेडकर लेन मधील बंद पडलेल्या बिल्डींगच्या पार्किंगमध्ये, न-हे, पुणे येथे उभे आहेत.
त्यातील एकाने काळया रंगाचे फुल बाह्यांचे हुडी जॅकेट व राखाडी रंगाची ट्रॅक पॅन्ट व दुरा-याने शेवाळे रंगाचे फुल बाह्यांचे हुडी जॅकेट व फिक्कट निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातलेली आहे. त्यानी लगेच ही माहिती वरिष्ट पोलिस नीक्षक निरीक्षक नंदकुमार विडवई याना कल्वली.
त्यांचा आदेश होताच सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने त्या ठिकाणी जावुन सापळा रचुन हर्षद संदीप वांजळे( वय १८ वर्षे, रा. औंदुबर कॉलनी, लेन नं अ, वारजे जकात नाका, वारजे) व ०१ विधीसंघर्षग्रस्त बालक याना ताब्यात घेतले.
चौकशी करता त्यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीस पुढील कारवाईकरीता हवेली पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस हवालदार प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, गणेश ढगे, बाळु गायकवाड, पोलीस नाईक रविंद्र लोखंडे, पोलीस अंमलदार साईकुमार कारके, महेश पाटील, श्रीकांत दगडे, शिवाजी सातपुते, नारायण बनकर, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १. गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.
