खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : संगम ब्रिजजवळ गाडीवरून जाणाऱ्या तरुणास दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी लुटल्याची घटना मंगळवारी (दि. १) मध्यरात्री घडली आहे. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथे राहणाऱ्या ३७ वर्षीय तरुणाने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. फिर्यादी हे गाडीवरून जात असताना, दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून, जीव घेण्याची धमकी दिली व त्यांच्यावर मारहाण केली.
फिर्यादीकडून रोख ७५०/- रुपये आणि ऑनलाईन व्यवहारातून १७५०/- रुपये, असे एकूण १७५०/- रुपये जबरदस्तीने काढून नेले आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब गुंजाळ करीत आहेत.
