आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

जर्मनीतील नोकऱ्यांबाबत आरटीओत मार्गदर्शन शिबीर

Spread the love

सोलापूर : जर्मनीत विविध नोकरी संधी उपलब्ध आहेत, त्याबाबत शासन पुढाकार घेत आहे. या बाबतची माहिती व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग या राज्यात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी २५ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र शासनामार्फत सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामुळे जर्मनीत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.

राज्यातील दहा हजार कुशल मनुष्यबळ टप्प्याटप्प्याने पुरवले जाणार आहे. त्या अनुषंगाने ४ सप्टेंबर रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर अंतर्गत येणारे पंढरपूर येथील आरटीओ शिबिरामध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी नेरपगार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक अविनाश अंभोरे यांनी शिबिरामध्ये चाचणीसाठी आलेल्या नागरिकांना या उपक्रमाबाबत माहिती दिली.

तसेच या संधी भविष्यात महाराष्ट्रातील कुशल कारागिरांसाठी कशा प्रकारे सुयोग्य आहेत आणि अर्थार्जनाच्या संधी कशा प्राप्त करून देतील याबाबत माहिती दिली. यावेळी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक तेजस्विनी वायचळ, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सिद्धारूढ कोलाटे यांनीही याबाबत मार्गदर्शन केले जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना या संधीचा लाभ घेता येईल.