आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

यश मिळवण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागतो : अतुल कुलकर्णी

Spread the love

सोलापूर : यश मिळवण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागतो. आपले ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल करावी लागते. त्यासाठी उच्च पातळीचे परिश्रम व प्रयत्न करण्याचा सल्ला, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना दिला.

“शिक्षक दिना” निमित्त अतुल कुलकर्णी रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधीर विद्यालय, सोलापूर येथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. विद्यालयात मूकबधीर दिव्यांग मुले शिक्षण घेत असून सदर शाळेत त्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांचे व्यक्तिमत्व विकास व पुनर्वसनाचे कार्य केले जाते.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतभर शिक्षक दिन साजरा केला जातो. त्या निमित्ताने विविध उपक्रम घेण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे सचिव रोटे. सुनील दावडा, मुख्याध्यापक व शिक्षकवर्ग उपस्थित होते.