महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे नॅक मूल्यांकन दिनांक ३० व ३१ ऑगस्ट रोजी पार पडले. या मूल्यांकन प्रक्रियेचा निकाल नुकताच नॅककडून जाहीर करण्यात आला. नॅकच्या अ श्रेयांकामुळे महाविद्यालयाच्या लौकिकात भर पडल्याचे कृष्णकुमार गोयल यांनी सांगितले.
गोयल म्हणाले की मागील पाच वर्षांत महाविद्यालयाने अभ्यास, अभ्यासेत्तर व इतर अभ्यासपूरक उपक्रमांत राष्ट्रीय छात्र सेना, स्पर्धा परीक्षा, क्रीडा, नेमबाजी या सर्व प्रकारात मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली आहे. यावेळी त्यांनी प्राचार्य संजय चाकणे व राजेंद्र लेले यांचा सत्कार केला.
यावेळी बोलताना प्राचार्य संजय चाकणे यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक केले व सर्व क्षेत्रात, विशेषतः इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, मोठ्या सुधारणा संस्थेने केल्याचे आवर्जून सांगितले.
महाविद्यालयाने केलेले संशोधन, लिखाण, क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी याचा आढावा घेतला.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अनिल मेहता, सचिव आनंद छाजेड, सहसचिव सुरजभान अगरवाल, संचालक रमेश अवस्थी, भुतडा, पंगुडवाले, अजय सूर्यवंशी, मुरकुटे, काशिनाथ देवधर आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजय सूर्यवंशी यांनी सर्वांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन राजेंद्र लेले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. अर्जुन मुसमाडे यांनी केले.
