आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गुंतवणुकीच्या बहाण्याने 23 लाखांची फसवणूक

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Social News, News, News Slider, Police, Social • September 6, 2024
Spread the love

पुणे : आयपीओत गुंतवणुकीच्या बहाण्याने विमानतळ येथे राहणाऱ्या एका तरुणाची २३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही फसवणूक ३ जुलै ते २० ऑगस्ट या कालावधीत घडली आहे. एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादीशी मोबाईलवर संपर्क साधला आणि शेअर खरेदीसाठी विविध बँक खात्यांची माहिती दिली.

शेअर तसेच आयपीओ मिळवून देण्याचे आमिष दाखवून, गुंतवणूक करण्यासाठी पैशांची मागणी केली. फिर्यादीला विश्वासात घेऊन त्यांच्या कडून २३,७०,५९८/- रुपये बँक खात्यात भरण्यास भाग पाडून आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार करत आहेत.