आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

प्रसन्न जीवन हेच सर्वश्रेष्ठ दान : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News Slider, Other, People, Social • September 9, 2024
Spread the love

पुणे : सर्वात सर्वश्रेष्ठ दान जर कुठले असेल तर प्रसन्न जीवन हेच सर्वश्रेष्ठ दान आहे प्रतिपादन पद्मश्री प.पु.आचार्य श्री चंदनाजी यांनी केले.

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचन मालेमध्ये त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प. पु. साध्वी श्री शिलापीजी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

प. पु. आचार्य श्री चंदनाजी म्हणाल्या, जीवनाचे पहिले सूत्र आज्ञा आहे. जर आपण बुद्धीने विचार केला तर ती फक्त माया नाही तर जाणणे सुद्धा आहे. जीवनाचे महत्त्वाचे अंग आहे सूत्रकता. आपण त्या सूत्रांवर कसे चालू शकतो याचा विचार केला पाहिजे.

असं नाही की आपण तिथंपर्यंत पोहोचू शकत नाही. असं नाही की आपण ते अनुभवू शकत नाही. तुम्हीसुद्धा त्या सूत्रांचे अनुसरण करून लक्ष्यापर्यंत पोहोचू शकता. कोणती वाणी, कोणते शब्द सत्य आहेत तर आपले निर्दोष वचन हेच सर्व सत्य आहे.

देवांच्या दिव्यअनुभूतीला आपणसुद्धा प्राप्त करू शकतो. निर्दोष जीवन, पवित्र जीवन कोणाकडूनही अपेक्षा न ठेवलेले जीवन आपल्यासाठी आकर्षकच आहे. या पर्युषण पर्वात अशाच महान पुरुषांच्या गाथा ऐकून त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपणही आपले जीवन अद्भुत करण्याचा प्रयत्न करूया.

त्या पुढे म्हणाल्या, द्रव्य सत्य आहे, नित्य आहे. प्रत्येक क्षणाचे परिवर्तन होते. त्यामुळे कर्तव्य महत्त्वाचे आहे. सर्वात दिव्य द्रव कोणते असेल तर आपले जीवन द्रव्य हे सर्वात दिव्य द्रव्य आहे.

ज्ञान,आत्म्याचे गुण म्हणजे ‘ग्यान’ जो प्रकाश देतो तो जगाला प्रकाशमान करतो पण त्याचबरोबर तो स्वतःही प्रकाशित होत असतो.

जो ‘मी’ आहे ते ज्ञान आहे. मी स्वतःला जाणतो. जगातले सगळे द्रव्य जाणून घेण्याची क्षमता जर कोणात असेल तर ती ‘आत्मद्रव्यात’ आहे.