आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कोंढवा पोलिसांनी मुद्देमाल केला परत

Spread the love

पुणे : कोंढवा पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेला, मात्र तपासानंतर जप्त केलेला २,५३,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल फिर्यादींना परत केला आहे. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, रा. गल्ली नं. २, टिळेकर नगर, कोंढवा, पुणे यांच्या राहत्या घरामध्ये झालेल्या घरफोडीमध्ये २०,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते.

तसेच, फिर्यादी, रा. फ्लॅट नं. १०२, पदमामनी अपार्टमेंट, पदमागुरु कॉलनी, ग.नं. ०५, हडपसर नगर, कोंढवा, पुणे यांच्या घरात १,४४,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. फिर्यादी, रा. ग.नं. ३०, तुकाराम लोणकर चाळ, शिवकृती सोसा, जवळ शिवनेरीनगर, कोंढवा, पुणे यांच्या घरातून ३०,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेले होते.

फिर्यादी, रा. स.नं. ५५, कात्रज, कोंढवा, पुणे, द्वारकाधाम सोसायटी, बाईट बेकरी शेजारी, टिळेकरनगर, कोंढवा, पुणे यांच्या घरातून ५९,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेली होती.

न्यायालयाच्या आदेशानुसार एकूण २,५३,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल फिर्यादींना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक पाटणकर कोंढवा पोलीस ठाणे यांच्या हस्ते परत करण्यात आला.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त परि. ०५ आर. राजा, आणि सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.