आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

डोक्यात दगड घालून ठार मारण्याचा प्रयत्न

Spread the love

पुणे : सिंहगड रस्त्यावरील एका तरुणावर तिघांनी डोक्यात दगड घालून खून करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. याबाबत पर्वती पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज चलवादी (वय २५ वर्षे, रा. सिंहगड रोड) याला शनिवारी रात्री दोन तरुणांनी बेदम मारहाण केली. डोक्यात दगड मारून त्याला गंभीर जखमी करून ठार मारण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी या प्रकरणी बालाजी हनुमंत कांबळे (वय २६ वर्षे, रा. लक्ष्मीनगर, नारायण टॉवर, ८ वा मजला, सिंहगड रोड) आणि सुहास सतीश भालेराव (वय २६ वर्षे, जयमल्हार, दांडेकर पुल, सिंहगड रोड) यांना अटक केली आहे. रामकृष्ण मठाच्या मागे, कॅनॉलजवळ आरोपी आढळले. सहायक पोलीस निरीक्षक राहुल नामदे तपास करत आहेत.