आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

येरवड्यात युवकाला लुटण्याचा प्रयत्न

Spread the love

पुणे : येरवड्यातील शास्त्रीनगर येथे एका तरुणाला लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. चोरट्यांनी त्याचा मोबाईल आणि रोख रक्कम लुटली. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी सह्याद्री हॉस्पिटलसमोर, शास्त्रीनगर येथे हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पायी जात असताना अनोळखी इसमांनी दुचाकीवरून त्यांच्या जवळ येऊन फिर्यादींना धारदार हत्याराने हाताच्या मनगटावर वार करून जखमी केले.

फिर्यादींच्या जवळील १७,५००/- रुपये रोख आणि ५,०००/- रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने लुटला. सहायक पोलीस निरीक्षक सुनील सोळंके तपास करीत आहेत.